पुण्यात मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रुद्रावतार धारण केला. यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत होऊन, नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरी वस्त्या पाण्याखाली गेल्या. या भरपावसात तृप्ती देसाई काही तरूणांच्या समूहासह पुणेकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरल्या.
पुणे सातारा या महामार्गावर असलेल्या खड्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून, तृप्ती देसाई यांनी काल मध्यरात्री 3 वाजेपर्यंत 20-30 तरूणांच्या मदतीने या महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांचे मार्गदर्शन केले.
रस्त्यावर असलेले खड्डे दिसून न आल्यामुळे अनेकदा अपघात घडून येतात. त्यामुळे तृप्ती देसाई आणि टीम ने खड्डे असलेल्या ठिकाणी रोपांच्या कुंड्या ठेवल्या. जेणेकरून अपघात टळतील आणि कोणत्याही प्रकारची जीवीतहानी होणार नाही.