रविवारी लाथाबुक्क्या… सोमवारी रक्षाबंधन

Update: 2019-06-04 03:34 GMT

गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या महिला नेत्या पाण्याची समस्या घेऊन भाजप आमदार बलराम थवानी यांच्याकडे गेले असता त्यांनी नितू तेजवानी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही सर्व घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यानंतर भाजप आमदाराने नितू यांची माफी तर मागितलीच, पण राखीही बांधून घेतली!

नितू तेजवानी नेमक्या काय म्हटल्या?

नरोदा भागात पाण्याची भीषण समस्या आहे. त्याबाबत सांगण्यासाठी मी आमदार थवानी यांच्याकडे गेले होते, पण तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांनी मला मारायलाच सुरुवात केली. मी खाली पडले तेव्हा त्याने मला लाथाबुक्क्याने मारले. त्याच्या समर्थकांनी माझ्या पतीलाही बेदम मारले. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायचे आहे की, गुजरातमध्ये भाजपच्या शासन काळात महिला सुरक्षित राहू शकतील की नाही?

दरम्यान, मारहाणीची घटना व्हायरल झाल्यावर आमदार थवानी यांना आपली चूक कळाली. ते म्हणाले, मी जाणूनबुजून हे केले नाही. गेली 22 वर्षे मी राजकारणात आहे, पण अशी कृती माझ्या हातून कधीच घडली नाही. मी त्या महिलेची जाहीर माफी मागतो. यानंतर आमदार थवानी आणि नितू तेजवानी यांच्यात रक्षाबंधन झाले असून त्यांनी मला बहिण मानलं आहे आणि मी त्यांना भाऊ मानल्याचं नितू यांनी म्हटलंय.

Similar News