महिला दुय्यमच...

Update: 2019-12-18 08:39 GMT

लैंगिक समानतेमध्ये भारताचे स्थान १०८ वे होते. यावर्षी जागतिक आर्थिक मंचाने लैंगिक समानतेचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये 153 देशांचा समावेश आहे. या क्रमवारीत भारताचा स्थान १०८ वरून थेट वर ना जात ११२ वर घसरण झाली आहे. तर महिलांचे आरोग्य, आर्थिक सहभाग या गोष्टींचा वैचार केला स्थिती अजून वाईट असून भारत खालून पाचव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत अव्वल स्थानी आइसलँड आहे. तर भारत ११२ व्या स्थानावर वर आहे. तर क्रमाने चीन 106, श्रीलंका, 102, नेपाळ 101, ब्राझील 92, इंडोनेशिया 85, बांगलादेश 50 या प्रमाणे क्रमवारी आहे. तर येमेन सर्वात शेवटच्या 153 व्या क्रमांकावर आहे, इराक 152 तर पाकिस्तान 151 व्या क्रमांकावर आहे. तर जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालानुसार जर जगात लैंगिक समानता आणायची असेल तर 2019 पासून 99.5 वर्षे अजून लागतील असा अहवाल सांगत आहे. त्यामुळे महिला व पुरूष यांच्यात आरोग्य, शिक्षण, काम, राजकारण यात खूप दरी आहे. तर 2006 मध्ये जागतिक आर्थिक मंचाने लैंगिक समानता क्रमवारी सुरू केली तेव्हा भारताचा 98 वा क्रमांक होता. तेव्हापासून भारताची एकूण क्रमवारीत घसरणच सुरु आहे.

तर भारतातील महिलांनी राजकीय सहभागात 18 वा क्रमांक पटकावला असला तरी आरोग्यात 150 वा तर महिलांच्या आर्थिक सहभागात 149 वा क्रमांक लागला आहे. शिक्षणातील लैंगिकत समानतेत सहभाग हा कमी असून या क्रमवारीत भारत 112 व्या क्रमांवर आहे. तर राजकीय सहभागात भारत 122 व्या क्रमांकावर आहे. कारण संसदेत 14.4 टक्के महिला आहेत. मंत्रिमंडळातील समावेशात भारत 69 व्या क्रमांकावर असून महिलांचे प्रमाण 23 टक्के आहे.

Similar News