काँग्रेस प्रवक्त्याने अमृता फडणविसांना विचारलं "ढेरी कमी केरायचं ऍप आहे का"?

Update: 2020-01-15 14:18 GMT

अमृता फडणवीस यांची चर्चा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून आहेच. मात्र त्यांच्या वैयक्तिक कारणांनमुळे देखील त्या नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्याची त्यांच्या फॅशनचीही चर्चा होतच असते. फेसबुक, ट्वीटर आणि इंन्स्टाग्रामवर नेहमी सक्रिय असून आपली मतं मांडतात आणि फोटोही टाकत असतात. त्यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आपला एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये त्या एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत. गुलाबी घागरा आणि त्यावर गोल्डन कलरचं शॉर्ट जॅकेट त्यांनी घातलेलं आहे. त्यांच्या पोस्टवरून अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येतं. आज संक्रांतीच्या शुभेच्छा त्यांनी आपला फोटो शेअर करत दिल्या. या फोटोवरून त्या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. सी. सुप्रिया या महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या यांनी हा फोटो आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंटवर पोस्ट करत त्याला एक कॅप्शन दिलं आहे.

" ढेरी कमी करायचं एखादं फोटो ॲप असेल तर मलाही सांगा की😬"

असा उपरोधिक प्रश्न त्यांनी अमृता फडणवीस यांना केला आहे. त्यांनी केलेल्या पोस्ट नंतर प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला. त्यातील काही प्रतिक्रिया खालीलप्रमाणे

Similar News