आंध्रप्रदेशला मिळाल्या पहिल्या महिला गृहमंत्री

Update: 2019-06-10 07:55 GMT

आंध्रप्रदेश राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा विजय झाला. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेवर आले.

रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात दलित महिला मेकाथोटी सुचारिता यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मेकाथोटी सुचारिता या प्रथिपाडू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. प्रथिपाडू हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. आता त्यांची राज्याच्या गृहमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी सुचारिता यांच्यासह 24 जणांना राज्यपाल ई. एस. एल. नरसिंह यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर आज जगमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप झाले यामध्ये सुचारिता यांना गृहमंत्रिपद देण्यात आले. दरम्यान सुचारिता यांची राज्याच्या गृहमंत्रिपदावर निवड झाल्याने त्यांच्या रुपाने राज्याला पहिल्यांदाच दलित समाजातील गृहमंत्री मिळाला आहे.

(मॅक्सवुमनचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Similar News