महिलांचे अत्याचार रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक पद्धतीची गरज

Update: 2020-01-09 05:27 GMT

महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलली गेली. याआधी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला होता.दरम्यान यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यातील महिलांच्या तक्रारी आदींच्या कामकाजाची आढावा बैठक महिला आयोगाच्या प्रतिनिधींशी घेतली.त्याचबरोबर महिला आयोगाचं कामकाजाची व्याप्ती वाढवणं आणि असे गुन्हे कमी करण्यासाठी फास्ट ट्रॅकची सुनावणी संदर्भात चर्चा झाली. यामध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे निवारण करण्यासाठी आणि असे प्रकरण तत्काळ मार्गी लावण्यासाठी फास्ट ट्रॅक पद्धतीने सुनावणी करणे गरजेचे आहे. असे गुन्हे नोंदवण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले पाहिजे यासाठी फास्ट ट्रॅक पद्धतीने सुनावणी हाती घेऊन प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करून दिली आहे.

https://twitter.com/AdvYashomatiINC/status/1215121424043528192?s=20

 

 

 

 

Similar News