गावात बिसलेरीपेक्षा महाग पाणी

Update: 2019-05-18 07:38 GMT

राज्याला भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागतं असून या विदारक परिस्थितीचा आढावा घेत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. पाण्याच्या एक-एक थेंबाला व्याकूळ झालेल्या ग्रामस्थांना पाण्याच्या एका घागरीसाठी बिसलेरीच्या पाण्यापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे. पाण्याच्या घोटासाठी लोकांची एकीकडे तारांबळ उडत असताना... सरकार मात्र सुस्त झाल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. उस्मानाबाद येथे 1 पाण्याची घागर 40 रुपये किंमतींने लोकांना विकत घ्यावी लागत आहे. दुष्काळाचे हे भीषण वास्तव त्यात हाताला पैसा नाही, शेतीत पीक नाही, रोजगार नाही... अशा भयंकर परिस्थितीत जगण्यासाठी लोकांची धडपड सुरु आहे. पाणी विकून पैसा कमवणाऱ्यांचा धुमाकूळ सुरु असताना सरकार मायबाप सुस्त बसले आहे.

पाहा चित्रा वाघ यांनी केलेलं ट्वीट :

https://twitter.com/chitrancp/status/1129610485085507585

 

 

 

 

Similar News