अखेर उधमपुरच्या मर्ता गावातील महिलांनी पाहिला रस्ता

Update: 2019-05-09 11:02 GMT

श्रीनगर: जम्मू-काश्मीरधल्या उधमपूर जिल्ह्यातील मर्ता गावात स्वातंत्र्यांच्या ७१ वर्षांनी आता कुठे पहाट झालीय. या गावानं स्वातंत्र्यांच्या ७१ वर्षांनंतर पहिला रस्ता पाहिला असल्याचे इथल्या महिलांनी सांगितले. त्यामुळे उधमपूरमधल्या मर्ता ग्रापंचायतीचे ग्रामस्थ स्वातंत्र्य मिळुनही रस्त्याच्या सुविधेच्या माध्यमातून ख-या स्वातंत्र्याची वाट पाहत होते. रस्ता नसल्यामुळे मर्ताच्या ग्रामस्थांना अनेक अडचणींचा व समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. शाळेत जाण्यासाठी मुलांना शेतांमधून सहा ते सात किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होते. तसेच महिलांनाही त्रास सहन करावा लागत असे गरोदर स्त्रियांना प्रसुतीच्या वेळी दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने पायपीट करावी लागत होती त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले ही आनंदाची बाब असल्याचं महिला सांगतात. स्वातंत्र्यानंतरच्या तब्बल सात दशकांनंतर उधमपूरला रस्ता मिळाला आहे. प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचं काम पूर्ण झालंय.

रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय. याबद्दल एका ७३ वर्षीय ग्रामस्थानं आनंद व्यक्त केला. 'मी लहान असताना अनेकांनी आपल्या गावात रस्ता येणार असल्याचं मला सांगितलं होतं. मात्र त्यासाठी कित्येक वर्ष लागली. आता मला निवृत्ती वेतन मिळतंय आणि गावात रस्ताही आला आहे असे त्यांनी सांगितले.

Similar News