डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची १० जूनला सुनावणी 

Update: 2019-06-05 04:33 GMT

डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जाची सुनावणी १० जूनला होणार असल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले आहे. तसेच या दिवसात डॉक्टरांच्या जामीन अर्जावर गुन्हे शाखेने पुढच्या सुनावणीच्या दिवसापर्यंत आपली बाजू मांडावी असे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले.

नायर रुग्णालयातील डॉ. पायल हिच्या आत्महत्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी याच रुग्णालयातील डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली आहे. रॅगिंग तसेच ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या तिघींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे. कोठडीत असतानाच या तिघींनी आपल्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र या तिघींच्या जामीन अर्जावर गुन्हे शाखेला १० जूनपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश दिल्याने तिघींच्या जामिनाबाबतचा निर्णय होऊ शकला नाही.

Similar News