पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांची कस्टडी क्राईम ब्रांचला देण्यास हायकोर्टाचा नकार

Update: 2019-06-06 09:41 GMT

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींची पोलीस कस्टडी क्राईम ब्रांचला देण्याच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘सुरूवातीलाच या प्रकरणाचा तपास योग्य अधिकाऱ्यांकडे का दिला नाही?’ असा सवाल करत न्यायमूर्ती एस. शिंदे यांनी राज्य सरकारची ही मागणी फोटाळून लावली आहे. मात्र, न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात आरोपींची चौकशी करण्याची मुभा क्राईम ब्रांचला देण्यात आली आहे.

मुंबईतल्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी 3 महिला डॉक्टर हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांना अटक केलीय. 4 जूनला मुंबई क्राईम ब्रांचने उच्च न्यायालयाकडे या तिघींच्या चौकशीसाठी कस्टडीची मागणी केली होती. त्यावर आज न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. आता पुढचे तीन दिवस न्यायालयीन कोठडीत काही तास आरोपींचा ताबा क्राईम ब्रांचला मिळणार आहे.

Similar News