मानलेल नातं ही रक्तापेक्षा मोठं असतं – धनंजय मुंडे

Update: 2019-10-29 15:34 GMT

दिवाळीमध्ये भाऊबीजच्या निमीत्ताने लहानपणी एकमेकांच्या सानिध्यात वाढलेले पण समाजाच्या रीतीमुळे दुरावलेले बहीण-भाऊ एकत्र येऊन सनाचा आनंद घेतात. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या एका मानलेल्या बहीणीबद्दल भावणीक पोस्ट केली आले. जाणून घेऊया त्यांच्या बद्दल.

शरद पवार यांनी आयोजित केलेल्या पाडव्यानिमीत्त धनंजय मुंडे हे बारामती येथील पवारांच्या निवासस्थानी गोंविदबाग येथे पोहचले. या कार्यक्रमा दरम्यान मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्या सोबत असलेला फोटो पोस्ट केला आहे. आणि संदर्भात त्य़ांनी काव्यस्वरूपात भावनीक पोस्ट केलं आहे. या पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, मानलेलं जरी असलं. तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं, बहिण भावाचे नातं असंच अनमोल असतं. एकीकडे राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या रक्ताची बहीण वाट्टेल ते आरोप करते तर दुसरी कडे काही नात नसताना फक्त मानलेल्या नात्यावर जीव उधळून द्यावा इतकं प्रेम मिळत, अशी भावना व्यक्त करून, धनंजय मुंडेंनी सुप्रिया सुळे यांच्या सोबत चा एक भावुक फोटो टाकून बहीण भावाच नात किती घट्ट असत हे दाखवून दिलं आहे.

Full View

Similar News