शिक्षण आणि समृद्धीमुळे वाढले घटस्फोट; सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा

Update: 2020-02-18 05:14 GMT

घरातील शिक्षण (Woman Education) आणि संपन्नतेमुळे अलिकडच्या काळात घटस्फोटांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलाय. अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“आजकाल घटस्फोटाच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. लोक क्षुल्लक कारणांवरून भांडत आहेत. सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात घटस्फोटांची प्रकरणे अधिक आहेत. शिक्षण आणि समृद्धीमुळे मग्रुरी वाढते आणि परिणामी कुटुंबे विभक्त होतात”, असं मोहन भागवत म्हणाले.

गेल्या २,००० वर्षांपासून ज्या प्रथा चालू आहेत त्यामुळे समाजाची ही अवस्था आहे. आपल्याकडे स्त्रिया घरांमध्येच मर्यादीत होत्या. २,००० वर्षांपूर्वीची घटस्फोटांच्या घटना नव्हत्या. तो आपल्या समाजाचा सुवर्णकाळ होता, असंही भागवत यावेळी म्हणाले.

Similar News