अखेर निर्भयाला न्याय मिळाला

Update: 2020-01-07 12:15 GMT

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी चार दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फासावर चढवलं जाणार आहे.दिल्लीच्या पाटीयाला हाउस कोर्टांना हा निर्णय दिलाय. कोर्टानं या चारही आरोपीविरुध्द डेथ वॉंरट जारी केलाय.

गेल्या महिन्यात या आरोपींना नोटीस देण्याचे निर्देश कोर्टानं तिहार जेल प्रशासनाला दिले होते. यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल कऱण्यासाठी आरोपींना पुन्हा ७ दिवसाची नोटीस दिली गेली होती. फाशीच्या शिक्षेला टाळण्याचा प्रयत्न या चार आरोपींचा होता.

फाशी देण्याची तयारी पुर्ण

दरम्यान तिहार तुरुंग प्रशासनानं फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी करण्याची तयारी पुर्ण झालीये. या चौघांनाही फाशी देण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करुन तुरुंगात नवं फाशी घर तयार करण्यात आलंय. चौघांनाही एकाचवेळी फाशी देणार असल्याचं तिहार प्रशासनानं यापुर्वीचं स्पष्ट केलंय. न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपींना २२ जानेवारीला सकाळी फासावर लटकवल्या जाणार आहे. अनेक वर्षानंतर एकाच वेळी चार जणांना फाशी दिली जाणार आहे.

१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर सहा जणांनी अमानूष बलात्कार केला. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाला उपचारासाठी सिंगापूर इथ हलवण्यात आलं होत. मात्र २६ डिसेंबरला उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यु झाला. या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणी पवन,अक्षय, विनय आणि मुकेश या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. खटल्याच्या दरम्यान मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात फाशी लावून आत्महत्या केली. तर अल्पवयीन असल्यामुळे दुसऱ्या एका आरोपीला ३ वर्षे सुधारणा गृहात ठेवण्यात आलं होत.

Similar News