रक्षण ते आरक्षण...

Update: 2019-04-05 09:17 GMT

  • काँग्रेस १७ व्या लोकसभाच्या पहिल्या सत्रात राज्यसभेमध्ये संविधान संशोधन विधेयक पास करुन लोकसभा आणि राज्यसभा मध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार
  • केंद्रीय नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार
  • समान परिश्रम अधिनियमाला प्रभावी पद्धतीने लागू करणार... स्त्री आणि पुरुषांना समान वेतन मिळावे यासाठी कायदा आणणार
  • आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्रमिक महिलांचा सहभाग अधिक प्रमाणात वाढ होण्यासाठी काही प्रशिक्षण आणि सुरक्षित परिवहन उपलब्ध करणार
  • महिलांनी रात्री पाळी करावी असा कायदा रद्द करणार
  • महिलांसाठी स्वच्छ शौचालय आणि शाळा, कॉलेज, सार्वजनिक स्थळावर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन लावणार
  • महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधी विशेष चौकशी समिती किंवा ऐजंसी स्थापन करुन मॉडेल कायदा ही बनवणार
  • राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन ( NRLM -2 ) ची सुरुवात करणार जेणेकरुन महिला उदर्निवाहसाठी साधन उपलब्ध होईल आणि सामाजिक बदल घडेल.
  • विधवा, परित्यक्ता महिलांसाठी सुरक्षित जीवन प्राप्त होण्यासाठी राज्य सरकारसोबत मिळून उपक्रम, कार्यक्रम घेणार
  • महिलांचे होणार शारीरिक शोषण, अत्याचाराला आळा बसवण्यासाठी कायद्याचा विस्तार प्रत्येक कार्यस्थळावर करण्याचा प्रयत्न करणार
  • महिलांना कायद्याची माहिती मिळावी तसेच पंचायतीतील महिलांना त्यांचे अधिकार माहित असावे यासाठी अधिकार मैत्रीची नियुक्ती करणार
  • बालविवाह कायदा सक्तीने लागू करणार जेणे करुन बालविवाहाची प्रथा बंद होईल
  • काँग्रेस आईसीडीएस का कार्यक्रम सुरु करणार जेणे करुन अंगनवाडी मध्ये गरजे नुसार क्रेच योजना लागू करणार.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र जर एक दोन गोष्टी सोडल्या तर बाकीचे मुद्दे फक्त आश्वासनं तेच मुद्दे फिरवून देण्यात आले आहे. यात कुठल्याही परित्यक्ता महिलांना आर्थिकरित्या किंवा रोजगार उपलब्ध करुन देऊ असे ठोस सांगण्यात आलं नाही. फक्त उपक्रम राबवू असं सांगितलं आहे.

 

Similar News