शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात पीक विम्याचा लाभ मिळत नाही. राज्यभरातील शेतकरी पीक वीमा कंपन्यांच्या गलथान कारभाळामुळे त्रस्त आहे. यासंबधित उपाययोजनेसाठी सरकार आणि सर्वच पक्ष मिळून दूरदृष्टीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना दिली.
शेतकऱ्यांना अडचणीच्या दिवसात पीक विम्याची रक्कम मिळायला हवी. पीक विमा कंपन्या विम्याची रक्कम देण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई न देणाऱ्या कंपन्यावर भविष्यात कठोर नियमावली तयार करू असं आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. यासंबधित उपाययोजनेसाठी सरकार आणि सर्वच पक्ष मिळून दूरदृष्टीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.