Coronavirus : लॉकडाऊनमध्ये चिमुकली पसरवतेय सकारात्मकता

Update: 2020-04-08 11:04 GMT

करोना विषाणूने जगभर थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या गुणाकाराने वाढत आहे. देशात लॉकडाऊन सुरु असून सगळीकडे भितीचे वातावरण पसरलं आहे. त्यात गोरगरिबांच जीवन आणखीच बिकट झालेलं आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबांना धान्य वाटप सुरु होतं. त्याचवेळी दुसऱ्या एका कोपऱ्यात इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी नयना काळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अस्लखित भाषण करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.

Full View

करोनामुळे सगळीकडे नकारत्मकतेचं वातावरण पसरलेलं असताना ही चिमुकली छत्रपती शिवाजी महाराज यांचे धडे आणि आठवणींना उजाळा देऊन समाजात सकारत्मकता पसरवत आहे. महाराजांविषयी असलेला प्रेम जिव्हाळा कशाप्रकारे जतन करत आहेत याचं मुर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतेय.

Similar News