कोरोना परिस्थितीत माजलगाव मधील पालावरील गोसावी आणि इतर भटक्या लोकांना विशेषतः गरोदर माता, स्तनदा मातांना, लहान मुलांना आरोग्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे (कुपोषणाने पुन्हा पालावर तोंड काढलं आहे. आज आहे त्या परिस्थितीत या लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळवुन देण्यासाठी आम्ही नवरा बायको निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न करत आहोत. ता. आरोग्य अधिकारी अनिल परदेशी,
डॉक्टर रुद्रवार सर, डॉक्टर कुलकर्णी सर, शहर पोलीस ठाण्याचे बुधवंत साहेब, रियाझ काझी इत्यादी.
एका महिलेची मोफत सोनोग्राफी तपासणी, एमसीटीस कार्ड एमर्जन्सी मध्ये काढुन घेतले चार लहान मुले, एक किशोरवयीन मुलगी दुसऱ्या दोन महिला. ही मुले एवढी सडलीत की, फारच जखमा चिघळल्या आहेत एक कुपोषित आहेत. आज ही समस्या फक्त माजलगाव मध्येच पालावर रहाणाऱ्या लोकांची नसुन सर्व महाराष्ट्रात आहे. मान्य आहे सध्या वैद्यकीय विभागावर ताण आहे पण माणसं मरू नयेत ही काळजी आपणा सर्वांना घ्यावी लागणार आहे.
यासाठी आरोग्याची टिम, अंगणवाडी कार्यकर्ती (अंगणवाड्या बंद आहेत तर) या लोकांनी लक्ष दिले तर फार मोठी मदत होईल. तसेच या रुग्णांना घेऊन जाऊन परत पालावर सोडण्याची सोय केली तर फार बरे होईल. नाही तर 104 अँम्बुलन्स रुग्णांना दवाखान्यात सोडून देईल आन रुग्ण पुन्हा 3 किलोमीटर चलत येतील (आज असच झालं होतं) दर महिन्याला 9 तारखेला गरोदर मातांची तपासणी जरी होत असली तरी एमर्जन्सी मध्ये एखादं सोनोग्राफी सेंटर रिझर्व्ह असायला हवे जिथे मोफत सोनोग्राफी केली जाईल.
अन्यथा लोक कोरोनाने नाही पण खायला नाही मिळाले आरोग्याची सुविधा नाही मिळाली म्हणुन आजारी पडतील अन मरतील.
(या परिस्थिती मध्ये घरात बसणं महत्वाचं आहे हे मान्य पण लोकांना वाचवणं पण महत्वाचे आहे कारण आता कोरोना फक्त आरोग्याची समस्या नाही राहीली यामुळे घराबाहेर पडावं लागतंय. )
- सत्यभामा सौंदरमल
सामाजिक कार्यकर्त्या