राजकीयदृष्ट्या असलेले कार्यक्रम शैक्षणिक परिसरात घेऊ नयेत

Update: 2020-01-25 09:19 GMT

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्याकाही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांवर टीका करत आहेत. 'सीएए' समर्थनार्थ मुंबईमध्ये शाळेत केलेल्या कार्यक्रमामुळे ते वादात सापडले होते. यावर काँग्रेस आक्रमक होऊन राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेले कार्यक्रम शैक्षणिक परिसरात घेऊ नयेत असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा वापर हा राजकीय विचार पसरवण्यासाठी होता कामा नये, असा आदेश देण्यात आला आहे, मात्र यामध्ये ‘सीएए’च्या समर्थनार्थ माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं व्याख्यान वादात सापडलं असल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यां पात्र पाठवलं आहे. व्याख्यानाचा हा कार्यक्रम आज शनिवारी धरमपेठ शिक्षण संस्थेच्या परिसरात असल्यामुळे याला काँग्रेसकडून विरोध दर्शवला आहे.

Similar News