मोदींपेक्षाही "ही" महिला झाली गुगलवर जास्त सर्च

Update: 2019-12-13 11:13 GMT

सध्या कोण जास्त सोशल मीडियावर सर्च होतो याकडे सर्वांची नजर असते. गुगलच्या सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मोदींना दोन जणांनी मागे टाकलंय. व्यक्ती, चित्रपट, गाणे, क्रीडा स्पर्धा आणि बातम्यांमध्ये कोणाला सर्वाधिक सर्च करण्यात आलं याची माहिती गुगलने दिलीय. सर्वात लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणावर सर्च केलं जात असून मोठ्या संख्येने त्यांचे फॉलोअर्स आहेत. गुगल २०१९ सर्च ट्रेंडमध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर यांना गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं. वर्षभरात गुगलवर जगात त्यांना सर्वाधिक सर्च केलं. गुगलच्या ट्रेंडमध्ये अभिनंदन वर्तमान हे टॉपवर राहिले. अभिनंदन यांच्यानंतर गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यातं आलं ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना. यानंतर सर्वाधिक सर्च केलेल्यांच्या यादी राणू मंडल सातव्या क्रमांकावर आहे. एक प्यार का नगमा है... हे गाणं गातानाता तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आली. हिमेश रेशमीयासोबतचं तेरी मेरी हे गाणं व्हायरल झाल्यानं ती आणखी चर्चेत आली होती.

Similar News