आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या आणि MMRDA ने बांधलेल्या चुनाभट्टी येथील बीकेसी उड्डाणपुलाचा उदघाटन सोहळा दिवाळीचे अवचित्य साधून आज पार पडला आहे.
दरम्यान, “या पुलाचे बांधकाम तीन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. २२ ऑक्टोबर या दिवशी पुलाचे उदघाटन होणार होते. मात्र, उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यानं लोकांसाठी हा पूल अजूनही बंद होता. हा उड्डाण पूल लोकांच्या सुविधेसाठी आहे की, नेत्यांच्या प्रशंसेसाठी आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीच्या उत्तर मुंबई कार्याध्यक्ष फहेमिदा हसन खान यांनी सरकारला विचारला आहे.