सात वर्षाच्या मुलीनं रेखाटलं गुगल डूडल

Update: 2019-11-14 10:37 GMT

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या स्वभावामुळे लहान मुलांना देखील ते फार आवडायचे. चिमुरड्यांचे लाडके चाचा यांचे २७ मे १९६४ साली निधन झाले. लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गुगलकडूनही बालदिनानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यावर्षी गुगलने घोषित केलेल्या या स्पर्धेत 'When I grow up, I hope...' हा विषय डुडल बनवण्यासाठी देण्यात आला होता. या स्पर्धेत अनेक मुलांनी सहभाग घेतला होता. सात वर्षांच्या दिव्यांशीनं 'वॉकिंग ट्री' या संकल्पनेवर आधारित डुडल रेखाटलं आहे. तिने चित्रित केलेल्या डुडलमध्ये झाडांना चालताना दाखवलं आहे. गंमत म्हणजे तिच्या चित्रात तिनं झाडांना बूटही घातले आहे. पुढच्या पिढीपर्यंत जंगलांचे व झाडांचे महत्त्व पोहोचावे हा त्या मागचा उद्देश.

दिव्यांशीनं रेखाटलेल्या या चित्राला बेस्ट डुडल म्हणून गुगलच्या होम पेजसाठी निवडलं गेल आहे. आणि या माध्यमातून सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

courtesy : social media

Similar News