राज्यांना जीएसटी परतावा लवकरच - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Update: 2019-12-17 10:02 GMT

टाइम्स नेटवर्कच्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापुढे वस्तू महागणार नाहीत असं आश्वासन दिलं आहे. यामध्ये मंदी, बेरोजगारी, जीएसटी संकलन आणि राज्यांचा परतावा या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आहे. एकीकडे मंदीच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्थेला बेजार केले असताना भारत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशी बनेल, यावर बोलताना सीतारामन म्हणाल्या की, सरकार आवश्यक उपाययोजना करत आहे.त्याचबरोबर सरकार 'मनरेगा' आणि पीएम किसान योजनेला प्राधान्य देत आहे. यामुळे ग्राहकांच्या हाती पैसा वाढेल आणि बाजारात वस्तूंची मागणी वाढेल. राज्यांना जीएसटी परतावा दिला जाईल, असे सीतारामन यांनी सांगितले. जीएसटी संकलनात वाढ होत असून अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे. महाराष्ट्र, केरळ सारख्या राज्यांनी जीएसटी परतावा लवकर मिळावा अशी मागणी केली आहे.

Similar News