नागरिकता सुधारणा विधेयकाने मुस्लिमांना बाहेर ठेवलं - अभिनेत्री स्वरा भास्कर

Update: 2019-12-10 09:35 GMT

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. 311 मतांना हे विधेयक मंजूर झालं आहे. तर विधेयकाच्या विरोधात 80 मतं पडली. 80 खासदारांनी या विधेयकांच्या विरोधात मतदान केलं. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी सादर केलं जाणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर एक ट्विट केलं त्यामध्ये तिने

https://twitter.com/ReallySwara/status/1204135133600550912?s=20

 

"भारतात धर्म हा नागरिकत्वाचा आधार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव होऊ शकत नाही. राज्य धर्माच्या आधारावर निर्णय घेऊ शकत नाही. नागरिकता सुधारणा विधेयकाने मुस्लिमांना बाहेर ठेवलं आहे. NRC/CAB यामधून जिन्नांचा पुनर्जन्म झाला आहे. हॅलो हिंदू पाकिस्तान!"

याआधी देखील स्वराने मोदी सरकारवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीवेळी स्वराने मोदी सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की शेतकऱ्यांची हत्या सरकारने केली आहे.

Similar News