Corona Virus: मुंबई लॉक डाऊन करण्याचा पंकजा मुंडेंचा सल्ला

Update: 2020-03-17 08:12 GMT

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण वाढतंय त्यातच कोरोनाने मुंबईतील ६४ वर्षीय व्यक्तीचा पहिला बळी घेतला आहे. मुंबईतील प्रचंड लोकसंख्येच्या दृष्टीने कोरोनाच्या संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घेणं गरजेचं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मुंबईत लॉक डाऊन करता येईल असं म्हटलं आहे.

“मुंबई बंदची मदत होऊ शकते का? नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर तर लेक यासाठी तयारी म्हणुन जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. ७ दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवता येईल. दुकाने जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी चालू ठेवता येतील.” असं मत पंकजा मुंडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

मात्र अद्याप सरकारचा मुंबई बंद करण्याचा कोणताही मानस नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात कलम १४४ लागू करण्यात आले असून नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना वारंवार पोलिसांकडून दिल्या जात आहेत.

Similar News