भाजप कार्यकर्ती प्रियंका शर्माची अटक योग्य ?

Update: 2019-05-16 05:43 GMT

'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्य फोटो फेसबुकवर शेअर केल्यामुळे भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्माची अटकेची कारवाई म्हणजे सकृतदर्शनी मनमानी आहे,'असं सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे.दरम्यान प्रियांका शर्मा यांची सुटका करण्यात उशीर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकारला फटकारले. या प्रकरणी भाजप नेत्यांनी नवी दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन करून जाहीर निषेद केला.

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी प्रियंका शर्मा यांनी अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्याऐवजी ममता बॅनर्जी यांचा चेहरा असलेले छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला. दरम्यान याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असून जामीन मंजूर केल्यानंतरही ही त्यांची सुटका करण्यात आली नाही असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर शर्मा यांची सुटका बुधवारी सकाळी ९.४० वाजता करण्यात आल्याचे बंगाल सरकारकडून कोर्टात सांगण्यात आले. मात्र, यावरून सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले. या संपूर्ण प्रकरणात शर्मा यांची अटक म्हणजे सकृतदर्शनी मनमानी दिसते आहे,' असे कोर्टाने म्हटले आहे.

Similar News