जागतिक महिला विकासाचा आढावा घेतांना समाजात झालेले बदल नोंदविले जाणे महत्वाचे

Update: 2019-12-25 07:36 GMT

बिजींग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनास (२८ ऑगस्ट,१९९५ ते १४ सप्टेंबर, १९९५) २५ वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य व देशपातळीवरील आढावा बैठकांचे आयोजन होत आहेत. यासंदर्भात डी.एस.टी (Development Support Team), स्त्री आधार केंद्र,पुणे च्यावतीने Task Force India (4th WWC Bijing+25) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्रच्या अध्यक्ष ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपले विचार मांडले. ना.डॉ.गोऱ्हे ह्या बिजींग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनास उपस्थित होत्या,त्या संदर्भात त्याबाबत बोलताना ते म्हणाल्या की, बिंजींग विश्व संमेलनास २५ पूर्ण होताना मागील काळाचा अभ्यास केले तर यूएन महिला आयोगाशी सामाजिक संस्थांचे सहयोग आणि संवाद असे राहिले आहेत.

यूएन महिला आयोग हे परस्परसंवादी मंच आहे. याठिकाणी राजनिती व समाजकारण एकत्रच होते कारण विविध देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या जागतिक शिखर परिषदा तेथे अनेक विषयावर होतात. यादरम्यान विकसनशील देशांच्या राजनेती आणि गरीब देशांच्या राजनितीचा संबंध हा महिला, बालक, रोजगार निर्मिती अशा विषयावर संवाद साधण्याचे काम यूएन मंच करत असल्याचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

बीजिंग चौथे विश्व महिला संमेलन १९९५ हे समानता, मैत्री, शांतता आणि विकास याविषयावर १८९ देशांच्या सामाजिक संस्थांनी भाग घेऊन चर्चा होऊन काम सुरू केले होते. यात महिला विकासाची कृती रुपरेषा तयार करण्यात आला होता आणि यावर गेली २५ वर्षे काम सुरू आहे.

यात महाराष्ट्र तसेच ऊत्तराखंड,दिल्ली,मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.

यावेळी १. महिलांच्या प्रगतीसाठी धोरण आणि यंत्रणा, २. शाश्वत जगण्याची साधने ३. महिला आणि पर्यावरण, ४. महिलांवरील हिंसाचार याविषयावर गटचर्चा चे आयोजन हॉल क्र.०५, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इन्डस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चर, सेनापती बापट रोड, पुणे येथे केले होते. यात विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे, श्री.मिनार पिंपळे,दिल्लीचे अजय झा, श्रीमती मिनी बेदी, राजस्थान च्या विभुती जोशी,अपर्णा सहाय, मध्यप्रदेशच्या अनिता पाँल ,मकाम संस्थेच्या सीमा कुलकर्णी, अनिता पॉल, निवेदिता दत्त,अपर्णा पाठक, यांनी मार्गदर्शन केले.सोनिया गार्चा बेदी यांनी संयोजन केले.

Similar News