महिलांना सक्षमीकरणाकडे घेऊन जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे

Update: 2019-04-19 15:10 GMT

देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यशस्वीपणे वडिलांचा वारसा चालवत आहेत. मुंबईत शिक्षण घेतलेल्या सुप्रिया या विज्ञानशाखेतील मायक्रोबायॉलॉजीच्या पदवीधर आहेत. लग्नानंतर सुप्रियाताई या पती सदानंद सुळे (बाळासाहेब ठाकरे यांचे बहिणीचे पुत्र) यांच्यासमवेत अमेरिकेत गेल्या. तिथे बर्कले युनिवर्सिटीत त्यांनी उच्चशिक्षण घेतले. काही वर्ष अमेरिका आणि जकार्ता येथे राहिल्यानंतर त्या भारतात परतल्या आणि त्यांच्या आवडत्या सामाजिक कार्यांमध्ये मग्न झाल्या. महिला सक्षमीकरण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. 2006 साली त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं. संसदेत आणि मतदारसंघात भरीव कामगिरी करणा-या सुप्रियाताईंनी 2014 साली बारामतीतून विजय मिळवला. ग्रामीण विकास, पर्यावरण, तंत्रज्ञान, महिला बचत गट अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम योगदान दिलेले आहे. दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या सुप्रियाताई 2019 साठी देखील बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

 

Similar News