दिव्यांग महिलेचं पॅरा ऑलम्पीक वर्ल्ड कप मध्ये ५४वा क्रमांक वर झेप

Update: 2019-12-13 15:38 GMT

बुलढाण्यातील अनुराधा पंढरी सोळंकी या दिव्यांग महिलेने पॅरा ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या इतिहासात व्हिलचेअरवरील तलवारबाजीच्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणाऱ्या पहिल्या दिव्यांग महिलेचा मान मिळवला आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी पहिलीच दिव्यांग महिला ठरली. अनुराधाने महाराष्ट्राचे नव्हे तर पुर्ण देशाचे नाव पॅरा ऑलम्पीक जागतिक स्थरावर नेले आहे. तलवारबाजी वर्ल्ड कप स्पर्धाच्या वर्ल्ड रॅन्कींग मध्ये तिची रॅन्कींग ५४ आहे. अशा प्रकारच्या रॅन्कींग मध्ये येणारी ती भारताकडून या खेळात १लीच दिव्यांग महिला ठरली आहे. १२ नोव्हें २०१९ ते १८ नोव्हें २०१९ पर्यन्त नेदरलॅण्ड येथे पार पडलेल्या व्हिलचेअर तलवारबाजी स्पर्धा मध्ये तिला ही रॅन्कीग मिळाली आहे . आता तिची निवड थायलंड येथे होणाऱ्या व्हिलचेयर तलवारबाजी वर्ल्ड गेम २०२० मध्ये झाली आहे . ही स्पर्धा २० फ्रेबुवारी २०२० पासुन ते २८ फ्रेबुवारी २०२० पर्यत होणार आहे. तिची घरची परिस्थीती हलाकीची आहे . ती बुलढाणा जिह्यातील चिखली मधील छोट्याशा पाटोदा गावामध्ये राहते . तिचे वडिल दुसऱ्याची शेती करून उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे जेमतेम अडीच एकर शेती आहे व त्यावर दोन मुली व २ मुले , आई, सासु , भावाचे ३ मुले, बहीणीचे २ मुले असा परिवार आहे. अनुराधा ही कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी घरची सर्व जबाबदारी तिच्यावर असताना जिद्दीला यश आलं.

तिच्या वडीलांनी तिला शिकवले त्यानंतर MA केले, एवढी मोठया जबाबदाऱ्या एकट्या वडिलांवर बघुन ती स्वतः आई सोबत . मजुरीला जायची व शाळेची फी भरायची. ती महाराष्ट्रातील पाहिली दिव्यांग महिला म्हणून क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन् झालं. राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट मध्ये गोलदांजी करत पहिल्यांदा ही स्पर्धा तिने जिंकली. पुढे तिची व्हॉलीबॉल मध्ये राज्यस्तरावर निवड झाली यामध्ये बुलढाणा जिल्हा उपविजेता ठरला, कामगिरीचा विचार करता तिची निवड राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्र संघात झाली तिथे महाराष्ट्र संघाला हार पत्कारवी लागली . गोदियां जिल्हयात पार पडलेल्या राज्यस्तरीय व्हीलचेयर तलवारबाजी स्पर्धा तिला गोल्ड मेडल मिळाले.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर व्हिलचेयर तलवारबाजीच्या तिन्ही प्रकारात ३ ब्रांन्स मेडल मिळाले त्यानंतर PCI मार्फत आंतराष्ट्रीय व्हिलचेयर तलवारबाजी साठी तिची निवड झाली. त्यामध्ये पॅराऑलम्पीक वर्ल्ड रॅन्कींग जागतिक व्हिलचेअर तलवारबाजीमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत तिची ५४ वी आहे. या स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने मला एका लाखा ची मदत केली होती बाकी मदत मला प्रतिष्ठीत व्यक्ती , सहकारी बॅक, मित्रपरिवार, सहकारी इत्यादीनी केली.ती आपल्या यशाचे श्रेय गणेश जाधव सर , संतोष शेजवळ सर ( तलवारबाजी कोच ), आई वडील , मित्रपरिवार ,मार्गदर्शक, सर्व सहकारी यांना देत असल्याचे तिने म्हटले.

https://youtu.be/n2XMOK24sfE

 

 

 

 

 

 

Similar News