राजकीय वारसा चालवु शकते अंकिता पाटील

Update: 2019-12-27 08:20 GMT

कॉंग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. राजकीय मतभेद असले तरी सामाजिक व्यासपीठावर सारे नेते हे आपले राजकीय वैर बाजूला ठेवून एकत्र येतात. हे नेत्यांकडून शिकण्यासारख काय असेल तर ते हेच. कधीतरी हे नेते सल्ले देण्यासाठी सुद्धा एकत्र येतात. असाच सल्ला हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मुलीला म्हणजेच नुकतेच नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा ) या संस्थेच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपद भूषविणारे अंकिता हर्षवर्धन पाटील. अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी म्हणजेच हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करून शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले आहेत. त्यांनी असं म्हंटलं आहे की समाजाला आपण काही देणे लागतो.हीच भावना आपल्या मनात ठेवून आता तू देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. मला खात्री आहे की तू नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करणार... तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व शुभाशीर्वाद! असा संदेश हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक विक्रमी मताधिक्क्याने जिकंलेल्या अंकिता पाटील या मात्र काँग्रेसमध्येच राहिल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अंकिता पाटील यांना आता दुहेरी कसरत करावी लागणार आहे. याला अंकिता पाटील कशा पद्धतीनं सामोरे जातात याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://twitter.com/harshvardhanji/status/1210237394605133824?s=21

 

 

 

 

Similar News