विधानसभेत का भडकल्या आमदार यशोमती ठाकूर

Update: 2019-07-01 11:00 GMT

उत्तर प्रदेशातील भाजपाच्या महिला नेत्या सुनिता सिंह यांनी हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरात घुसून त्यांच्या महिलांवर सामुहिक बलात्कार केला पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर केलं आहे. यासंदर्भात आज विधानसभेत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर प्रश्न उपस्थित करुन सुनिता सिंह यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच यासंर्भात राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्ष विजया रहाटकर यांनी फक्त ट्विट केलं आहे. महिला आयोगाने फक्त ट्विट करु नये तर कारवाई करण्याचं धाडस दाखवावं असं आव्हान यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. तसेच मॉब लिंचींगविरोधात कडक कायदा झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

काय आहे सुनिता सिंह प्रकरण?

सुनिता सिंह यांनी आपल्या फेसबुक वॉलवरुन अनेक हिंदू पुरुषांना आवाहन केले की मुस्लिमांच्या घरात घूसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करा.तेव्हाच मुस्लमानांना त्यांची औकात समजेल आणि भारत सुरक्षित राहील असं म्हटलं होतं. मात्र ही पोस्ट काही वेळाने त्यांनी डिलीट करुन टाकली होती. परंतु या पोस्टचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला.

त्यांच्या या वक्तव्यानंतर देशाभरात एकच खळबळ सुरु झाली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी देखील त्यांच्या या पोस्ट उत्तर दिलं आहे.

https://twitter.com/ReallySwara/status/1144733070676779008?s=19

दरम्यान राष्ट्रीय महिला मोर्चाच्या आणि राज्य महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांनी यावर ट्वीट करत सुनिता सिंह यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

https://twitter.com/VijayaRahatkar/status/1144881230116089856?s=19

Similar News