मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज नाही, शिवसेनेसाठी कायम काम करत राहील : भावना गवळी

Update: 2019-06-06 09:30 GMT

केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला नाही, म्हणून नाराज नसल्याचं शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी स्पष्ट केलंय. भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव करत सलग पाचव्यांदा संसदेत प्रवेश केला. त्यामुळे विविध संघटना व व्यक्ती कडून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना त्यांनी या विजयाचं श्रेय त्यांनी मतदारसंघातल्या जनतेला दिलं. यासोबत मंत्रिमंडळात समावेश झाला नाही याची कोणतीही खंत मनात नाही. याबाबत मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. याऊलट येत्या विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेला आणखी बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचं भावना गवळी यांनी सांगितलं.

केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला वाढीव मंत्रीपद मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यात मंत्री म्हणून यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, मंत्रीपद न मिळाल्यानं त्या नाराज आहेत अशा बातम्या येत होत्या. या वृत्ताचं स्वतः भावना गवळी यांनी खंडन केलंय.

Similar News