दहावीच्या यशानंतर सुरु झाली माझी संघर्षमय कहाणी....

Update: 2019-06-12 10:41 GMT

नगरजवळील निंबळक येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मारुती कळसे या फक्त 10 वी पास झालेल्या व्यक्तीची हि कहाणी.... “शिकत असताना कुटुंबाला शेतीत मदत करायचो परंतु पाण्याची मुबलकता नसल्यामुळे सगळं पावसावर अवलंबून असायचं

त्यामुळे १९७८ साली नगरला एमआयडीसीमध्ये ड्रीलको मेटल कार्बाईड कंपनीत साधा कामगार म्हणून नोकरीला लागलो. भारतात हाताच्या बोटावर मोजता येतील अश्या ह्या कंपन्या. चांगला चाललेला व्यवसाय कौटुंबिक कारणाने मालकांनी बंद करण्याचा निर्णय घेतला, मात्र बंद करताना अनाकलनीय कारणांनी बँका, कामगार, पुरवठादार अश्या सगळ्यांना बुडवून बंद केला. मारुती कळसे नी एक जुनी पिठाची गिरणी विकत घेतली १४००० रुपयात. जेवढी बचत होती ती सगळी गुंतवली. विजेचं कनेक्शन घेतलं आणि घराच्या ओट्यावर गिरणी उभी केली. परिस्थिती अशी कि पाऊस आला तर झाकायला साध छत नाही. पण पाऊस आला तर ताडपत्री टाकून गिरणी झाकायची आणि पाऊस गेला कि पुन्हा चालू. गिरणी आणि शेती अशी जोड लावून २००६ पर्यंत काम चालू होत. २००६ साली गुजरातमध्ये असलेल्या नातेवाईकाकडे गेलो; अनेक यंत्रे पाहिली. तांत्रिक कामाची आवड आणि सवय असल्यामुळे त्याचा उपयोग लक्षात आला.

२००६ साली आधी डाळ तयार करण्याचं मशीन, मग शेवया तयार करण्याचं मशीन, नंतर पापड तयार करण्याचं मशीन आणलं. पिठाच्या गिरणीच्या जोडीला डाळ मिल, पापड-शेवया करून देणं अशी काम सुरु झाली.शहराच्या जवळ असल्यानं प्रसिद्धी कामाचा उरक आणि दर्जा यामुळं काम मिळले आता मुलं आणि सुना मदतीला असतात.... उन्हाळ्यात तर अशी परिस्थिती असते कि रात्री १२ ते सकाळी ५ एवढीच विश्रांती असते.... ज्यावेळी हा व्यवसाय कमी असतो त्या वेळी पावसाळ्यात पुन्हा शेतीत जुंपून घेतलेलं असतं. आर्थिक परिस्थितीत बदल झाला, घर बांधल, घराजवळ कामासाठी लागणाऱ्या यंत्रांसाठी मोठं छत बांधलं. शेतीत गुंतवणूक केली, नातवंड चांगलं शिक्षण घेत आहे. यशोदा डाळ मिल कुटुंबाच्या कष्टांच आणि जिद्दीच प्रतिक म्हणून उभं आहे. त्यावेळी कारखाना बंद पडला तेव्हा अनेक लोक अनेक महिने दारात बसून राहायचे, अनेक व्यसनाच्या आहारी गेले, बरबाद झाले, काही मजुरी करायला लागले, कुणी साधा सिक्युरिटी गार्ड म्हणून पोट भरायला लागले..... परंतु मी योग्य वेळी निर्णय घेऊन दुसरा जोडधंदा सुरु करून सगळा प्रपंच सावरून पुन्हा नव्याने सगळे सुरु केले अन यशस्वी ठरलो...”

Similar News