जिल्हापरिषद अध्यक्ष ते मंत्री, कसा झाला आदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास

Update: 2019-12-30 08:54 GMT

आकर्षक समुद्र किनाऱ्यांसह नैसर्गिक सौदर्य लाभलेल्या, त्याचबरोबर ऐतिहासीक किल्ले असलेल्या रायगड जिल्हातील एका तरुणीनं आज मंत्री पदाची शपथ घेतली. आमदार आदिती तटकरे! असं त्या तरुणीचं नाव. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या. रायगड जिल्ह्यांमध्ये खासदार सुनिल तटकरेंचा बालेकिल्ला म्हणून परीचित आहे. सुनिल तटकरे यांचे वडील दत्ताजीराव तटकरे यांनी या घराण्यात राजकारणाची बीजे रोवली. त्यांचा वारसा सुनिल तटकरे यांनी कायम ठेवला. रायगड जिल्ह्यात तटकरे कुटुंबाचा कायमच दबदबा राहिला आहे. २०१९ ला आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा निवडणूक लढवली आणि त्या मोठ्या फरकाने निवडूणही आल्या.

आदिती यांना लहाणपणापासुन घरातुनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांचं शिक्षण संपल्यानंतर वडिलांच्या प्रचारासाठी २००९ ला सहभागी होऊन आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केली. त्यानंतर कोकण युवती राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी काम पाहिले. २०१७ ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून त्यांनी खऱ्या अर्थाने सक्रिय राजकारणात प्रवेश केला.‍‍ राजकीय वातावरण वाढत असल्याने त्या अगदी सहजपणे सर्वत्र वावरत होत्या. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद भूषवताना आपल्या मतदारसंघासाठी त्यांनी अनेक कामं केली.

आता तटकरेंची कन्या आदिती तटकरे या देखिल वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातुन ३९ हजार ६२१ मतांनी विजयी झाल्या. अदिती तटकरेंच्या रुपाने एक तरूण महिला आमदार या मतदारसंघाला मिळाली. मतदारसंघातील वाड्यावस्त्या सर्वत्र मतदारांना भेटी देत आदिती यांनी जोरदार प्रचार केला होता. खासदार सुनिल तटकरेंनी देखील आपल्या मुलीला निवडून आणण्याचा दृढ निश्चय केला होता. आणि त्या जिंकल्या.

https://youtu.be/l5QWa2drZkU

 

 

 

Similar News