भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई नेहमी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे चर्चेत असतात. यंदाच्या दिवाळीत तृप्ती देसाई यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे.
सत्ता कोणाचीही येवो पण परिस्थिती बदलली पाहीजे, ही विचारधारा मनात बाळगून तृप्ती देसाई यांनी लोणावळ्यातील सिग्नलवर खेळणी विकणाऱ्या लहान मुलांना बिस्कीटपुडे देऊन त्यांच्या सह दिवाळी साजरी केली आहे.