विधानसभा 2019 : शेवगाव पाथर्डीचे तिकिट कोणाला? काय म्हणाल्या पंकजा मुंडे...

Update: 2019-09-10 10:51 GMT

शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्याविरूद्ध बंड करत भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या Adv. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी द्यावी. या मागणीसाठी प्रताप ढाकणे समर्थक कार्यकर्ते परळीत पोहोचले होते.

ढाकणे यांना भाजपाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी ढाकणे समर्थकांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. परंतु पंकजा मुंडेनी त्यांची उलट फिरकी घेत यावर आपण विचार करू असं म्हणत, तुम्ही ज्यांच्यासाठी उमेदवारी मागत आहात ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत. मुंडे साहेब असताना ते राष्ट्रवादीत गेले होते. आता त्यांना उमेदवारी कशी देता येईल? असा प्रश्न करत पंकजा मुंडे यांनी मोनिका राजळे यांची उमेदवारी सुरक्षित असल्याचा संकेत दिला आहे.

Similar News