एका फोन कॉलनं त्यांना राजकारणात आणलं...

Update: 2019-05-04 05:33 GMT

एखादा फोन कॉल तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकतो. बिझनेस एडीटर असलेल्या सुप्रिया श्रीनेत यांना एक कॉंल आला. आणि एक पत्रकार असलेल्या सुप्रिया श्रीनेत सक्रीय राजकारणात आल्या.

28 मार्चला सकाळी अचानक सुप्रिया श्रीनेत यांच्या मोबाइलची रिंग वाजली आणि महाराजगंज मधुन निवडणुकीची तयारी करा असं त्यांना फोनवरून सांगण्यात आलं . या फोन कॉलने दहा मिनिटांत व्यावसायिक संपादक सुप्रिया श्रीनेत यांना नेता बनवलं. आज, त्या महाराजगंजमधील काँग्रेसच्या उमेदवार म्हणून परतापुर शहरात मतांसाठी घरोघरी जाऊन मत मागत आहेत..

सुप्रिया श्रीनेतांच्या राजकारणात येण्याच्या धाडसी वृत्ती मागेही त्यांच्या कुटुंबाची एक दुःखद बाब आहे. सुप्रिया श्रीनेत या महाराजगंजचे नेते आणि दोन वेळा खासदार असलेल्या हर्षवर्धन सिंह यांची मुलगी आहे. 2014 मध्ये सुप्रिया यांच्या आईचा मृत्यू झाला. २०१५ ला सुप्रिया यांचे भाऊ वर्धन सिंह यांचाही मृत्यू झाला. या मोठ्या संकटातून कुटूंब बाहेर येत नाही. त्यातच त्य़ांच्य़ावरुन वडिलांचं छत्र हरपलं. २०१६ मध्ये हर्षवर्धन सिंग यांचा मृत्यू झाला. तीन वर्षात कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर वडील हर्षवर्धन सिंग यांचा वारसा पुढे नेण्याचा सुप्रियांनी निर्णय घेतला आहे

Similar News