२३ वर्षीय देशातील पहिली आदिवासी महिला पायलट- अनुप्रिया लाक्रा

Update: 2019-09-09 14:01 GMT

ही कहानी आहे, आकाशी झेप घेण्याचे स्वप्न उरी बाळगून त्या स्वप्नाला सत्यात उतरवणा-या एका जिद्दी मुलीची, उडीसातील माओवाद्यांनी त्रस्त असलेल्या मालकनगीरी जिल्ह्यातील 23 वर्षीय अनुप्रिया लाक्रा ही आदीवासी मुलगी, मागास भागातील असुनही देशातील पहिली आदीवासी महिला पायलट बनली आहे.

कॉन्वेंटमध्ये शिकलेल्या, अनुप्रियाच्या पायलट होण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमूळे तिने 2012 साली इंजीनिअरींगचे शिक्षण मध्येच सोडून एका विमानचलन अकॅडमीमध्ये सात वर्षे प्रशिक्षण घेतले. हा सात वर्षांचा कालावधी तिच्यासाठी फार कठीण असला तरी तिच्या अथक परिश्रमामुळे 2019 मध्ये एका खासगी विमानामध्ये ती को-पायलट म्हणून रुजू झाली अन् अनुप्रियाचं पायलट होण्याचं स्वप्नं पूर्ण झाले. तिच्या उत्तम कामगिरीमुळे लवकरच ती परदेशातही विमानांची भरारी घेईल अशी आशा आहे.

अतिशय दुर्मीळ भागातून असूनही कठोर परिश्रम करून आपल्या मुलीने स्वत:चे पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, यामुळे अनुप्रियाच्या पालकांना तिचे खुप कौतूक आहे. तसेच उडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील तिचे ट्विटरवरुन अभिनंदन केले.

Similar News