२०१९ लोकसभा निवडणूक : मागास जिल्ह्याला विकासाच्या मार्गी लावणाऱ्या डॉ. हिना गावित

Update: 2019-04-15 11:53 GMT

डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या हिना गावित या देखील वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्कालीन माजी मंत्री आणि सध्या भाजपचे आमदार असलेले डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून हिना यांना राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. भाजप खासदार डॉक्टर हिना यांना लोकसंघटनाची नस चांगलीच सापडलेली आहे. 2014 साली काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणा-या नंदुरबार मतदारसंघातून निवडून येत भाजपला तिथे यश मिळवून देण्याचा विजय त्यांच्या नावावर आहे. आदिवासी समाजातून पुढे येऊन सर्वात कमी वयात खासदारपदाची जबाबदारी तसंच चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणा-या हिना गावित यांची लोकप्रिय नेत्या म्हणून ख्याती आहे. नंदुरबारसारख्या एकेकाळच्या मागास आणि विकासापासून वंचित जिल्ह्यातील अनेक विकासकामांना डॉ. हिना गावित यांनी मार्गी लावलं आहे.

Similar News