साता-याची स्नेहांजली परीस्थितीवर मात करत बनली सबलेफ्टनंट

Update: 2021-11-30 08:55 GMT

सातारा जिल्हा हा असा जिल्हा आहे जिथल्या प्रत्येक तरुणाच्या मनात देशसेवेत रुजू होण्याचं स्वप्न असत. हे स्वप्न सत्यात देखील उतरत कारण त्या साठी लागणारी मेहनत या तरुणांच्या कडून केली जाते आणि म्हणूनच सर्वात जास्त तरुण देशसेवेत असणारा जिल्हा हा आमचा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातला वाई हा तालुका. वाई शहर काही फार मोठ नाही. पण त्याचा कला,क्रीडा,संस्कृती, आणि ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे. पेशवे कालीन मंदिरं. असणारया वाईला दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. अशा गाव आणि शहर याच्या सीमारेषेवर असणारया वाई मधली एक मुलगी आज नौदलात सबलेफ्टनंट पदासाठी निवडली जाते. याचा आम्हा सर्व वाईकरांना सार्थ अभिमान आहे. जुन्या लोकांचा वारसा पुढची पिढी अनेक क्षेत्रात नाव कमावून पुढे जपते आहे. स्नेहांजली राजेंद्र ननावरे. राजेंद्र ननावरे आणि आरती ननावरे यांची हि कन्या. वाई मधल्या जॉय अकॅडमीच्या विद्यार्थिनी. आई वडिलांचा छोटा गृह उद्योग. त्यांच्या आई म्हणाल्या आम्ही आमचा व्यवसाय फक्त २१० रुपया पासून सुरु सुरु केला होता. आज खूप प्रगती केली आहे त्यांनी त्यांच्या व्यवसायात. त्याचं जे "आलेपाक" प्रोडक्ट आहे ते संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये जात असत. स्नेहांजली यांना चिकाटी हा गुण त्यांच्या आई वडिलांच्या कडून मिळालेला आहे असं म्हणता येईल.

त्या आर्चरीच्या NATIONA LEVEL च्या खेळाडू आहेत. जेव्हा त्यांना मी विचारलं कि हा सगळा प्रवास कसा सुरु झाला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून वाटलं कि आपल्या मुलाला पालकांनी जे आवडेल ते करू द्यावच पण त्याच्यासाठी जे चांगल असेल ते करण्याची थोडी सक्ती देखील करावी. स्नेहांजली यांच्या वडिलांनी त्यांना ४ थी मध्ये असताना आग्रहाने सक्तीनेच म्हणू एका समरकॅम्प ला घातलं. तिथे त्यांना आर्चरी शिकवत होते. समरकॅम्प संपताना तिथे एक आर्चरीची स्पर्धा घेण्यात आली आणि त्या स्पर्धेत त्या दुसर्या आल्या. तिथून त्यांचा आर्चरी मधला इंटरेस्ट वाढू लागला. मग दहावीत असे पर्यंत त्यांनी वाई मधेच आर्चरीच ट्रेनिंग घेतल. दहावी मध्ये त्यांनी त्याचं एम ठरवलं होत. "मला आयएस" व्हायचं आहे. मग मात्र ११ वी(१२वी) च एक वर्ष त्या पुण्यात हे(आर्चरी) ट्रेनिंग घेण्यासाठी गेल्या. पुन्हा वर्षभराने वाईला परत येऊन त्यांनी त्याचं ग्रज्युएशन बी.ए विथ इंग्लिश पूर्ण केलं. दरम्यान आर्चरी ची PRACTIS न चुकता सुरूच होती. पुन्हा एकदा आयएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या पुन्हा यूपीएससी आणि सिव्हील सर्व्हिसेसच्या तयारी साठी पुण्यात गेल्या. २०१९ ते २०२० सेल्फ स्टडीसाठी त्या पुन्हा वाई मध्ये आल्या. त्यांनी COMPITATIVE EXAM च्या तिनहि परीक्षा उत्तम मार्क्सनी क्लियर केल्या. आणि हे करताना त्यांनी एमए विथ इंग्लिश हि मास्टर डिग्री देखील मिळवली.

त्या फक्त अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या नाहीत, कविता, जिम्नॅस्टिक्स, क्रिकेट, अभिनय, हे सगळं त्या आवडीने करत होत्या. अष्टपैलु व्यक्तिमत्व म्हणाव असं हे व्यक्तिमत्व. जेव्हा नेव्ही मध्ये संपूर्ण देशात एकच व्हेकन्सी निघते आणि ती स्त्री आणि पुरुष दोघांच्या साठी असते, त्या वेळी संपूर्ण देशातून निवडली गेलेली व्यक्ती असते एक मुलगी. त्या आहेत स्नेहांजली ननावरे. वयाच्या २३ व्या वर्षी अनेक मुलांना आपण पुढे काय कराव हे कळत नाही पण स्नेहाजली मात्र त्यांच्या एम च्या दिशेने एक एक दमदार पाऊल पुढे टाकत आहेत. अतिशय सुस्पष्ट सुसुत्र असे विचार, त्यामधला एक ठाम विश्वास हे त्यांच्या बोलण्यातूनहि अगदी सहज जाणवत होत. खरतर त्याची निवड झालेली कळल्या पासून अनेक अनेक लोकं त्यांना भेटायला येत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी बोलवून त्याचं कौतक केलं जात आहे.आज आम्ही गेलो तेव्हा हि त्या एका कार्यक्रमातून परत आल्या होत्या, तरी हि अतिशय छान गप्पा त्यांनी आमच्या जवळ मारल्या. त्यांची आई म्हणाली, आर्चरीच्या स्टेट लेव्हलला खेळायला जाताना मी तिला सांगितल होत, तुला आर्चरी साठी लागणार कीट तू यात मेडल मिळवून आलीस तर नवीन घेऊन देणार. हि त्यांची लेक (Bronze )मेडल घेऊन घरी आली. आईच नुकतच नवीन केलेलं मंगळसूत्र ठेऊन बहात्तर हजराचे कीट आईने लेकीला घेऊन दिलं. आणि आज लेकीने त्याच सोन केलं. खूप खूप अनुभव शेअर केले त्यांनी. पण नोकरी साठी दिलेला हा पहिला इंटरव्हू आणि त्यात सिलेक्ट होऊन सब लेफ्टनंट पदासाठी त्यांची झालेली निवड. अतिशय अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. आई वडिलाचा पूर्ण पाठींबा, शाळा कॉलेज मधले योग्य मार्गदर्शन यांनी वाई मधलं हे एक अभिमानस्पद व्यक्तिमत्व आम्हाला लाभल आहे. आता त्या केरळला ट्रेनिंग साठी जॉईन होतील आणि पुढच्या वेळी वाईला येतील ते नावा मागे सबलेफ्टनंट हे बिरूद अभिमानाने लावून येतील. मी आजच त्यांच्या कडे पुढच्या भेटीसाठी वेळ मागून घेतली आहे. कारण त्यावेळी त्या वाई मध्ये येतील तेव्हा याच्या पेक्षा शतपटीने त्याचं कौतक होईल. आम्ही वाट बघतोय त्याची. मूर्ती लहान पण कीर्ती महान याच एक जीत जागत उदाहरण म्हणजे स्नेहांजली ननावरे. पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

(तनुजा समित इनामदार)

Tags:    

Similar News