International Women Day : दबंग स्वरा भास्कर

बागी कहलाती हूँ मै! असं म्हणणारी अभिनेत्री स्वरा भास्कर... स्वकर्तृत्वार स्वतःचं खणखणीत नाणं वाजवून चित्रपट सृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्याबरोबरच सामाजिक समस्या असो अथवा महिलांचे अधिकार असो… आपल्या फिल्म्समधून 'ब्लॅक लिस्टेड होऊ याची भिती न बाळगता व्यक्त होणाऱ्या दबंग स्वराची महिला दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी घेतलेली मुलाखत नक्की पाहा...

Update: 2021-03-06 16:08 GMT

चंदेरी दुनियेत बहुसंख्येने कलाकार यांचे 'मुखवटे आणि चेहरे ' असतात. हे आपण सगळेच जाणून असतो. ह्यातील किती मुखवट्यांमागे एक संवेदनशील मन असते. ह्या प्रश्नावर संशोधन करावे लागेल. अभिनेत्री स्वरा भास्कर मात्र नेहमीच स्वतःच्या भावना सडेतोडपणे व्यक्त करत आलीये, आपल्या भावना मोकळेपणी मांडताना तिने स्वतःचं नुकसान होईल ह्याचाही विचार प्रसंगी बाजूला सारला. हो, सर्वसाधारणपणे अभिनेते -अभिनेत्री दिग्गज दिग्दर्शकांवर थेट टीका करणं टाळतात, आपण त्या फिल्म मेकरच्या आगामी फिल्म्समधून 'ब्लॅक लिस्टेड' होऊ ही त्यांची भीती निराधार नसते ! पण अशा कुठल्याही वास्तविक -अवास्तविक भया -किंवा आकसापायी निर्माण झालेल्या बाबींचा स्वरा भास्कर विचार करत नाही. मागे एका घटनेनंतर स्वराने संजय लीला भन्साली ह्या नामी मेकरवर देखील टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळेच स्वरा भास्करचे दुसरे नाव 'दबंग स्वरा' असे पडले.

महिला दिनाच्या निमित्ताने काय आहे ''दबंग स्वरा" साठी स्त्री मुक्ती !

'आपल्या देशाच्या राजधानीत (दिल्ली) मी जन्मले. शिक्षण इथेच झाले. मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांना समान पद्धतीने आई-वडिलांनी वाढवले. माझे वडील विंग कमांडर तर आई प्राध्यापक. घरात अभिनयाचा वारसा अजिबातच नव्हता. मी अभ्यासात तल्लख होते, द्विपदवीधर झाल्याने कदाचित आणखी पुढे शिक्षण मी घेईन किंवा उत्तम करियर घडवेन असं पालकांना वाटत असताना मी अभिनयाचा विचार करतेय. हा त्यांच्यासाठी मानसिक धक्का होता, पण तरीही मन दृढ करत त्यांनी मला आनंदानं मुंबईत येऊन अभिनय करण्याची आजादी दिली. फक्त मी माझ्या आवडत्या क्षेत्रात करियर करावं इतकं मर्यादित स्वातंत्र दिलं नाही, तर मनात जे काही असेल ते बिनधास्तपणे बोलण्याचीही आजादी घरूनच मिळाली.

त्यामुळे कधीही मी स्त्री आहे म्हणून मला सतत दबून, भावना दडपून जगलं पाहिजे. असं शिकवलं नाही. माझं कुटूंब, चरितार्थ चालवणं ही जवाबदारी माझ्यावर कधीच नव्हती, त्यामुळे वाटेल त्या तडजोडी करून पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर हे प्रांत-ही ध्येयं माझी ह्या क्षेत्रात कधीही नव्हतीच. त्यामुळे आतापावेतो माझ्यावर कुणी वक्रदृष्टी टाकली असं घडलं नाही, घडणारही नाही.

कुठलाही गैर प्रकार मी खपवून घेणाऱ्यातील नाही. मला प्रकर्षाने वाटत आलंय, विशेषतः स्त्रियांच्या बाबत, स्त्री जेंव्हा अगतिक होते, तिची असहायता पाहून तिचा गैरफायदा घेतला जातो. मी न पूर्वी कधी अगतिक होते, न भविष्यात असेन, माझा कुणी गैरफायदा घेऊ शकेल असं घडू देणाऱ्यातील मी नाही. मी सक्षम आहे !

माझ्या मते घरोघरच्या पालकांनी त्यांच्या घरांतील मुलींना हे संस्कार दिले पाहिजेत की त्यांच्याबाबत जर काही वावगं घडत असेल तर त्याबद्दल भीती न बाळगता बोला. भावना दडपणे हा गुन्हा मानला पाहिजे. भावनांना वाट करून द्यायला हवी ही आजच्या काळाची गरज आहे. मला बंडखोर वृत्तीची मानलं जातं.

बागी कहलाती हूँ मै! पण हा स्वभाव गुण महिलांबाबत तिचा दुर्गुण का गृहित धरला जातो? माझा भाऊ देखील रोखठोक स्वभावाचा आहेच की, मग तो बागी नाही का? असो, स्त्रीने कायम सोशिक असावं ही सामाजिक धारणा पूर्वापार चालत आलीये. मला ती मान्य नाही.

मी फेमिनिस्ट आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर अर्थात होय असेच आहे.

यह कहने में मुझे कोई आपत्ति नहीं, की हां मैं फेमिनिस्ट हूँ। और सभी को फेमिनिस्ट होना भी चाहिए। फेमिनिज्म यानी लड़ाई अधिकारों की। यह लड़ाई सिर्फ महिलाओं के अधिकारों की ही नहीं, अगर किसी पुरुष को भी उसके अधिकारों से उसे वंचित रखा गया हो तो उसे भी खुद के हकों के लिए लड़ना होगा। मैं मानती हूँ यह लड़ाई बराबरी की है। पर होता यह रहा है की सदियों से महिलाओ को तमाम बंदिशे रखी जाती है, उन पर हर तरह से सख्ती बरती जाती है। मेरा यह मानना है यह बंदिशे सिर्फ महिलाओं क्यों? क्यों महिलाऐं हमेशा चूल्हा चौका करे ? क्यों मर्द पैसे कमाएं ? मर्द को कभी रोना नहीं चाहिए ! यह नियम कानून किसने बनाएं ? यह सब ट्रैडिशनल सोच है और मुझे इन दायरों की सोच पर आपत्ति है ! कोई मर्द घर का काम संभाल सकता है और उसकी पत्नी जॉब करे तो कुछ गलत बात नहीं ! मेरी सोच के नुसार मर्द और स्त्री एक सिक्के के दो पहलू है. पुरुष आणि स्त्री ह्यापैकी कुणीही कमी नाही.. सम -समान आहेत ..

दुर्देवाने आपल्या देशात फेमिनिस्ट स्त्रीची तिच्या पश्चात हेटाळणी होताना दिसते. पण हेही तितकेच खरं की हक्क आणि अधिकारांच्या मागणीसाठी लढावे लागते, मग ते देशाचे स्वातंत्र्य असो अथवा स्वहक्क ! हक्क जेंव्हा डावलले जातात तेंव्हा त्यासाठी संघर्ष अटळ असतो. अलिकडच्या काही वर्षात स्त्रीला तिचे अधिकार बऱ्याच प्रमाणात मिळू लागलेत. पण ते समाजातील वरच्या वर्गातील स्त्रीला.. आजही तळागाळातल्या स्त्रियांचे घरीदारी शोषण होते. ही वस्तूस्थिती आहे. समाज सहजासहजी हक्क देणार नाही, त्यासाठी, त्या न्याय्य हक्कांच्या अधिकारांना मिळवण्यासाठी स्त्रीचा लढा असतो मग ती फेमिनिस्ट का मानली जावी ? '

पाश्चिमात्य देशातही पुरुषप्रधान समाज आहेच. हे चित्र आपल्या देशातच आहे असं नाही. चित्रपटसृष्टी देखील ह्याला अपवाद नाही. मीडियामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या मात्र, लक्षणीय वाढती आहे. पण कितीही वाढती महिला कर्मचाऱ्यांची संख्या असली तरीही त्यांना त्यांचे हक्क मागून मिळत नसतील तर त्यांनी ते आवाज उंचावून मागितले तर बिघडले कुठे ? स्वहक्कासाठी लढणे म्हणजे फेमिनिझम ठरत असल्यास त्यात गैर ते काय ?

हम महिलाओं को बचपन से पीढ़ी दर पीढ़ी यही सिखाया जाता है की समर्पण, त्याग में अपनों पर जिंदगी कुर्बान करो।. जीवन भर एक स्त्री शादी से पहले अपने माता -पिता, भाई की सेवा करती है और फिर विवाह के बाद अपने पति, बच्चे, ससुराल सदस्य की सेवा में खुद को अर्पित करती है, शायद इस चक्र में खुद जीना भूल जाती है ! मैं सभी महिलाओं से कहना चाहूंगी, परिवार के प्रति समर्पित होने के लिए खुद को भुलाने की जरुरत नहीं, आप सक्षम-मजबूत होंगी तो परिवार चलेगा। खुद का भी खयाadvisesadvisesल रखना बहुत जरुरी है। '

(सदर मुलाखत ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी घेतली आहे.)

Tags:    

Similar News