मुलगी झाली म्हणून आईने जन्मानंतर महिनाभर हात देखील लावला नाही..

Update: 2023-06-29 08:26 GMT

 तुम्ही अनेक कार्यक्रमात मोठ-मोठ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या बाजूने अंगरक्षकांचा गराडा पाहिला असेल. अत्यंत धिप्पाडच्या धिप्पाड ब्लॅक गॉगल, सफारी ड्रेस घालून हे लोक नेहमी त्या व्यक्तीसोबत फिरत असतात. तुम्ही थोडी कल्पना करा की, एखाद्या व्यक्तीला संरक्षण देणारे असे पुरुष नाही तर महिला आहेत. गालातल्या गालात तुम्ही थोडं हसला असणार तर अनेकांना हा विचार करूनच भुवया उंचावल्या असतील. पण आज आपल्या इथं आलेल्या या महिलेने हे करून दाखवले आहे. देशातील पहिली महिला बाउन्सर म्हणून आज त्यांची सर्वत्र ख्याती आहे. पण यापाठीमागे असणारा तिचा संगर्ष देखील कमी नाही. पोलीस भरतीचे स्वप्न मनाशी घेऊन धडपडणारी दीपा परब ही मुलगी घरच्या परिस्थितीला तोंड देत यामध्ये अपयशी ठरली. शंभर टक्के पोलीस भरती होणार अशी खात्री होती. तितकी मेहनत तिने घेतली होती. पण परीक्षेलाच घरातील पालकांनी जाऊ दिलं नाही.

मुलगीचा जन्म हा जणू दीपा परब यांच्यासाठी शापच होता. महिलेने घरातच राहावं, घरची कामे करावी अशा मानसिकतेच्या कुटुंबात ती वाढत होती. तिच्यावरती अनेक बंधने होती. पण या सगळ्या बंधनांना जुगारून तिनं ध्येय साध्य करायचे ठरवलं होतं. आयुष्यात एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगातून त्यांनी महिला बाउन्सर होण्याचे ठरवलं. त्यादिवशी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांची सावली म्हणून काम करण्याचं ठरवलं. त्यानंतर दीपा परब आणि त्यांच्यासोबत काही महिलांचा एक ग्रुप तयार झाला. अनेक जण बघून हसायचे, टोमणे मारायचे. पण त्यांना एक संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. अनेकांची तोंड बंद केली आणि महिला काय करू शकतात हे दाखवून दिलं. त्यांचा हा संघर्ष अत्यंत प्रेरणादायी आहे हा संपूर्ण संघर्ष त्यांनी कार्यक्रमात मांडला...

Full View


Tags:    

Similar News