तिने दिला ॲन्टी बॉडीज तयार झालेल्या मुलाला जन्म

Update: 2020-12-01 16:15 GMT

सिंगापूर येथील सेलीन एनजी चैन ही गरोदर महिला मार्च महिन्यात कोविड पॉजिटिव होती. नोव्हेंबर महिन्यात तिची प्रसूती झाली. तिच्या बाळाच्या शरीरात ॲन्टी बॉडीज तयार झाल्या होत्या. त्यामुळे नॅशनल यूनिवर्सिटी हॉस्पिटल येथील कोविडवर काम करणाऱ्या तज्ञांच्या लक्षात आले की गर्भवती मातेकडून बाळास कोरोना संक्रमण होण्याची शक्यता असू शकते.

माध्यमांशी बोलतांना सेनील म्हणाली की तिच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांना अशी आशंका आहे की तिच्याद्वारे बाळाला कोरोनाचे संक्रमण झाले असावे. तिला मार्च महिन्यात कोविड झाला असताना ती रुग्णालयात उपचार घेऊन अडीच आठवड्यात बरी होऊन घरी आली होती.

जरी या सेलीनच्या केस संदर्भात वैद्यकीय क्षेत्रात चर्चा होतअसली तरी डब्ल्यूएचओ नुसार मातेच्या गर्भातून बाळाला कोविडची लागण झाल्याचे एकही उदाहरण समोर आलेले नाही. या संदर्भात NDTV ने वृत्त दिले आहे.

Tags:    

Similar News