Home > व्हिडीओ > 'भाजप आपल्या पापांनीच मरत आहे', रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला

'भाजप आपल्या पापांनीच मरत आहे', रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला

भाजप आपल्या पापांनीच मरत आहे, रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला
X

कोरोनाच्या संकटकाळात महाविकासआघाडी सरकारला जागं करण्यासाठी भाजप ने केलेल्या 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलनावर मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. आज भाजपने जे काही आदोलन केलं त्याला काहीच अर्थ नाही. याउलट जर भाजपने सरकारला मदत करुन केंद्राकडून जीएसटीचा परतावा मिळवून दिला असता तर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी त्या पैशांची मदत झाली असती अशी टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा...

“संकटाच्या काळात भाजपनं सरकारसोबत बसुन मार्ग काढायला हवा होता पण त्यांनी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करुन त्यांची ती पात्रता नाही हे सिद्ध केलंय.” असा टोला रुपाली पाटील यांनी लगावला आहे. ‘मॅक्सवूमन’च्या लाइव्ह सेशनमध्ये त्या महाराष्ट्र बचाव आंदोलन, सोशल मीडिया ट्रोलींग आणि लॉकडाऊन या विषयांवर बोलत होत्या. भाजप सत्तेसाठी जी कृत्य करत आहे त्या पापांनीच ते मरणार आहेत असंही मत त्यांनी यावेळी मांडलं.

“विरोधकांना परिस्थितीचं गांभीर्य नसल्यामुळे कोरोनाच्या संकटात त्यांनी राजकारण केलं आणि त्यामुळेच त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. या ट्रोलींगचे जनक भाजपच आहे.” असा टोला लगावत रुपाली पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला उद्देशून काढलेल्या ‘परतीचा पाऊस’ या व्यंगचित्राची आठवण करुन दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलींगविषयी बोलताना रुपाली पाटील यांनी म्हटलं की, “ज्यावेळी तुम्ही सत्तेवर होता त्यावेळी तुम्ही लोकांची मजा घेत होता. आता महाविकासघाडीचे सत्तेत गेलेले पक्ष आणि आम्ही विरोधात असताना तुम्ही आम्हाला ट्रोल करत होता. त्यावेळी सायबरकडे केलेल्या तक्रारींचीही तुम्ही दखल घेतली नाही. त्यामुळे तुम्ही आता तेच फेडत आहात.”

पाहा संपुर्ण व्हिडीओ..

https://youtu.be/F0W5YIkCudk

Updated : 24 May 2020 5:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top