Home > Uncategorized > चंद्रकांत पाटील आदरार्थी दादा की गुंडगिरीतील दादा? - अॅड रुपाली ठोंबरे

चंद्रकांत पाटील आदरार्थी दादा की गुंडगिरीतील दादा? - अॅड रुपाली ठोंबरे

चंद्रकांत पाटील आदरार्थी दादा की गुंडगिरीतील दादा? - अॅड रुपाली ठोंबरे
X

गणेश उत्सवातील विसर्जनाच्या आदल्यादिवशी म्हणजे काल, मनसे शहर अध्यक्षा Adv. रुपाली ठोंबरे-पाटील यांना पुणे पोलिसांनी दोन दिवस पुण्याच्या बाहेर राहण्याची सक्ती केली आहे. याचे कारण म्हणजे पूण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे गणेश मंडळावर गुन्हे दाखल करू असे म्हटले . पंरतू त्यांना विरोध दर्शवून पुण्याचा गणेश उत्सव आनंदात पार पडावा आणि स्पीकरची तसेच दोन बेस, दोन टॉप बारा वाजेपर्यंत वाजवण्याची परवानगी द्यावी असं निवेदन रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केलं होतं.

याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना रूपाली ठोंबरे यांनी या संदर्भात बोलताना त्यांनी केलेलं निवेदन पालकमंत्री चंद्रकांत दादांना खूपच झोंबलेले दिसतयं. म्हणूनच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अशा पद्धतीची नोटीस त्यांना बजावली आहे. तसंच, “तुम्ही सत्तेवर आहात म्हणून अशा प्रकारे पोलीस यंत्रणा चा गैरवापर करून गणेश मंडळ कार्यकर्त्यांना त्रास देऊन खोटे गुन्हे दाखल करू लागलात, तर तुम्हाला आता आदरार्थी दादा म्हणायचं की, भाईगिरीतील दादा म्हणायचं”, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

Updated : 12 Sep 2019 2:56 PM GMT
Next Story
Share it
Top