Home > News > Boys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी! 

Boys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी! 

Boys Locker Room : मुलीची मुलाला बलात्काराची धमकी! 
X

(Boys Locker Room) अलिकडे फेक आय डी तयार करुन तरुण मुलं मुली सोशल मीडियावर Active असतात. त्यांचं खरं नाव समजणं मुश्कील असतं. आत्तापर्यंत मुलं यामध्ये पुढं असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, आता मुली देखील यामध्ये पुढं असल्याचं समोर आलं आहे.

Boys Locker Room या इन्स्टाग्रामवर अलिकडेच चांगलाच सक्रीय ग्रुप मानला जातो. या ग्रुपवर अश्लिल चॅटींग चालत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एक मुलगी फेक अकाउंट तयार करुन मुलांशी चॅट करत होती. विशेष म्हणजे अल्पवयीन असलेल्या या मुलीनं मुलाला बलात्काराची धमकी दिल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

याशिवाय या ग्रुपच्या इतर 24 सदस्यांची चौकशी केली असता, त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या ग्रुपमधील दोन मुलांमधील स्नॅपचॅटच्या संभाषणात बलात्कार आणि बलात्काराच्या धमक्यांसह लैंगिक छळाविषयी बोललं असल्याचं तपासात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा

ऑर्थर रोड कारागृह व पोलिस वसाहतीची किशोरी पेडणेकर यांनी केली पाहणी

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे राज्यात 50 लाख व केंद्रात १ करोड़ रुपय़ांची मदत

पोलिसांनी अधिक तपास केला असता, या दोघांशी संवाद साधत असलेल्यांपैकी एक मुलगी असल्याचे समजले, तिने 'सिद्धार्थ' नावाच्या एका काल्पनिक अकाउंट चा वापर करून दुसर्‍या अल्पवयीन मुलाची खाजगी माहिती जाणून घेण्यासाठी फेक अकाउंट काढल्याचं सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे डीसीपी अनिमेश रॉय यांच्या म्हणण्यानुसार, या ग्रुपच्या Admin ला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हा Admin नोएडामधील एका शाळेचा विद्यार्थी आहे.

हे ही वाचा

एका एलिसा ची गोष्ट…

तुम्ही मुलांवर अपेक्षांचं ओझं थोपताय का?

तर या ग्रुपच्या संबंधित एक अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली होती. जो दिल्लीतील नामांकित शाळेतला विद्यार्थी आहे.

पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की तिने हे सर्व केवळ विनोदात केले आहे. यामागे कोणताही हेतू नव्हता. यात बोलणार्‍या मुलाचीही चौकशी केली गेली.

Updated : 11 May 2020 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top