अनुयायी नाही तर नेतृत्व तयार करा
X
(Coronavirus) कोरोना व्हायरस च्या संकटामुळे आगामी काळात विपरीत पडसाद उमटणार आहेत. सामान्य नागरिकांना अनेक बऱ्या वाईट संकटाना सामोरं जावं लागणार आहे. या संकटातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. म्हणूनच नेतेमंडळींनी कार्यकर्ते घडवण्यापेक्षा अधिकाधिक नेतृत्व घडवावं अशी सूचक विनंती बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्रा यांनी केली आहे.
हे ही वाचा
- पुरुषांनो सावधान! बायकोला माराल तर व्हाल संस्थात्मक क्वारंटाईन
- ठाणे-पालघरमध्ये ते पेटवत आहेत गोरगरीबांची चुल
- यशोगाथा एका यशोधरेची… !
"संकटकाळात नेतृत्वाची दुसरी फळी फक्त महत्वाचीच नसून अपरिहार्य असते. म्हणून या काळात नेत्यांनी अनुयायी घडवण्यापेक्षा नेतृत्व घडवण्यावर भर दिला पाहिजे. एकमेकांना आधार देऊनच आपण उभं राहू शकतो." अशी भावना ट्विटरच्या माध्यमातून सुमन चंद्रा यांनी व्यक्त केली आहे.
Second line of leadership is not just important but indispensable in the time of crisis. Thus, most definitely, leaders must create more leaders than followers.
We rise by lifting others !! #leadership
— Suman Rawat Chandra, IAS (@oiseaulibre3) April 18, 2020