Home > रिपोर्ट > ‘चांगला रस्ता उखडून परत बनवण्यापेक्षा तो निधी कोरोनाविरोधात वापरा’   

‘चांगला रस्ता उखडून परत बनवण्यापेक्षा तो निधी कोरोनाविरोधात वापरा’   

‘चांगला रस्ता उखडून परत बनवण्यापेक्षा तो निधी कोरोनाविरोधात वापरा’   
X

राज्यात कोरोना व्हायरस विषाणूचे सर्वाधिक रुग्णांची संख्या मुंबईनंतर पुण्यात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे मनपा नगरसेवकांचा ७० टक्के निधी रद्द करावा अशी विनंती मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना केली आहे. रद्द केलेला निधी पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा, औषध यांच्यावर वापरावा असं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा..

आपले बहुतांशी नगरसेवक हे फुटपाथ परत परत करणे, चांगला रस्ता उखडून तो परत बांधणे अशा पद्धतीने काम करुन निधी वाया घालवत आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत नगरसेवकाचा निधी कमी करून तो पुणे शहरातील लोकांना करोना विषाणू मुक्त करण्यासाठी वापरावा असा मार्ग रुपाली पाटील यांनी अजित पवार आणि पुणे आयुक्त शेखर गायकवाड यांना सुचवला आहे.

Updated : 21 April 2020 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top