Home > रिपोर्ट > संताच्या भुमीतच साधूंची हत्या, गृहमंत्री करतायत काय?- तृप्ती देसाई

संताच्या भुमीतच साधूंची हत्या, गृहमंत्री करतायत काय?- तृप्ती देसाई

संताच्या भुमीतच साधूंची हत्या, गृहमंत्री करतायत काय?- तृप्ती देसाई
X

पालघरमधील जमावाकडून साधूंच्या हत्येप्रकरणी दोषींना लवकरात लवकर फाशी होण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करताना महाराष्ट्र ही साधू संतांची भुमी आहे आणि अशा महाराष्ट्रातच जर जमावाकडून साधू संतांची हत्या व्हायला लागली तर गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था, पोलिस करतायत काय असा प्रश्न भुमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.

“देशात लॉकडाऊनमध्ये जमावबंदी लागू झालेली असताना पालघरमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत असताना साधूंना मारहाण केली जाते. साधूंना मारहाण करुन त्यांची हत्या झाली. त्यानंतर शंभराच्यावर आरोपींना अटक झाली असल्याचं जरी सांगितलं जात आहे. तरीही हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नेणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊन संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत दोषींना फासावर लटकवलं जावं.” असं मत त्यांनी व्हिडीओच्या माध्यामातून व्यक्त केलंय. पाही व्हीडीओ..

https://youtu.be/el-KDN2o5lU

Updated : 21 April 2020 5:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top