'त्या' पाकिस्तानी पत्रकारास टिकेवरुन नगमा आणि संबित पात्रा यांच्यात ट्वीटयुद्ध

Update: 2020-05-07 05:39 GMT

भारतीय सैन्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या स्वयंघोषित पकिस्तानी डिफेंस एक्सपर्ट तारिक पीरजादा (Tariq Pirzada) यांच्यावर भाजप नेते संबित पात्रा यांनी आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातून बोचरी टीका केली होती. यावर राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या नगमा (Nagma) यांनी विरोध दर्शवला आहे.

हे ही वाचा...

'तारिक पीरजादा यांच्यासाठी आजतक वर भाजप प्रवक्त्य़ांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे त्यावर माझा विश्वास बसत नाही.' असं ट्वीट नगमा यांनी केलं आहे. तुम्हाला त्यांचा फक्त अपमानचं करायचा असतो तर त्यांना चर्चेसाठी बोलावता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नग्मा यांच्या या ट्वीटमुळे त्यांचा सोशल मीडियावर तीव्र विरोध केला जातोय.

काश्मीरचा आतंकवादी हिजबुल मुजाहिदीन कमांडर रियाज नायकू याच्या एनकाऊंटर संबंधी चर्चा आजतक वाहिनीवर चालली होती. तारिक पीरजादा आणि भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांच्यातील वादादरम्यान पीरजादा यांना ‘पीर कम जीहादी जादा’ असं म्हटलं होतं.

कोण आहे तारिक पीरजादा?

तारिक पीरजादा पाकिस्तानी आणि भारतीय वृत्तवाहिन्यांवर काश्मीर मुद्द्यावरील चर्चासत्रांमध्ये आपली भारतविरोधी मत मांडत असतात. भारतीय सैन्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करणारे तारिक स्वत:ला पकिस्तानी डिफेंस एक्सपर्ट आणि पत्रकार म्हणवतात. भारतीय माध्यमं काश्मीर आणि भारतीय सैन्यासंबंधित घटनांमध्ये विवादीत वक्तव्यांसाठी पीरजादा यांना आवर्जून आमंत्रित करतात. भारत आणि पाकिस्तान मधील तणावग्रस्त वातावरण कायम ठेवण्यासाठी माध्यम पीरजादा यांना चर्चेसाठी आमंत्रित करुन मोठी रक्कम का मोजतात? असा प्रश्न उपस्थित केला जातो.

गतवर्षी कलम ३७० काश्मीरमधून रद्द केल्यानंतर एका पाकिस्तानी वाहिनीवर पीरजादा यांनी म्हटलं होत की, “जर भारत सरकार कोणत्याही हिंदूला तीथे आणून ठेवत असेल तर त्यांची हत्या केली पाहिजे.”

नगमा यांच्य़ा ट्वीटवर संबित पात्रा (Sambit Patra) यांनी कॉंग्रेसला धारेवर धरलं आहे. त्यांनी दिलेलं उत्तर तुम्ही वाचू शकता..