Home > विधीमंडळात पुन्हा मुंडे बहिण-भावात राजकीय सामना रंगणार?

विधीमंडळात पुन्हा मुंडे बहिण-भावात राजकीय सामना रंगणार?

विधीमंडळात पुन्हा मुंडे बहिण-भावात राजकीय सामना रंगणार?
X

भाजप पक्षाकडून माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी तयारी केली जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यातील विधानपरिषदेच्या लढतीत पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. परळी जिल्ह्यातून कागदपत्रांची जमवाजमव सुरु करण्यात आल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

हे ही वाचा...

विधानसभा निवडणूकीतील दारुण पराभवानंतर भाजप कोअर कमिटीतील पदाचा राजीनामा दिला होता. गोपीनाथ गडावरील सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांनी जाहिरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. सोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्यासह वाढलेली जवळीक भाजपच्या चिंतेत वाढ झाली होती. यादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंकजा मुंडे य़ांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केली होता.

आता विधानपरिषेतील ९ जागांसाठी लढत होणार आहे. या लढतीत भाजपचा ३ ते ४ जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. विधीमंडळात पुन्हा मुंडे बहिण-भावात राजकीय सामना रंगताना दिसू शकेल. भविष्यात विधानपरिषदेवर पंकजा मुंडे यांच्या हाती विरोधीपक्षनेते पदाची सुत्रे दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

पंकजा मुंडे यांनी मात्र, ‘कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही.’ असं म्हणत या वृत्ताचं खंडण केलं आहे.

Updated : 7 May 2020 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top